निवृत्त जवान तुकाराम डफळ यांच्या घरापर्यंत रॅली...

Image may contain: 8 people, people standing and outdoorधामारी, ता. 11 फेब्रुवारी 2020 (संपत कारकूड): 'श्वास आणि ध्यास' घेऊन देशाच्या सीमा रक्षण करून आपणाला सुरक्षित ठेवणाऱया जवानांप्रती आदराची भावना ठेऊन त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे. जसे 'लेडीज फस्ट' ला प्रधान्य देतो, तसे सोल्जर फस्ट ची मानसिकता ठेऊन सैनिकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा आदर करा, असे उद्गार समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले.


धामारी (ता. शिरूर) येथील सैनिक तुकाराम डफळ यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभनिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बोलताना त्यांनी पुढे सांगितले कि, प्रत्येक निवृत्त सैनिकाचा सन्मान सोहळा झाला पाहिजे. मेजर तुकाराम डफळ यांच्यापासून हि सुरुवात होत आहे. देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून समाजातील उदासीन आणि स्वार्थाची भावना नष्ट होण्यासाठी असे कायर्क्रम परिणामकारक ठरू शकतात. राज्यामध्ये शिक्षक मतदारसंघ असतो त्याप्रमाणे सैनिक मतदारसंघ तयार करा. राजकारणात शिस्त येईल. एनआरसीचा कायदा वाईट नाही. पाकिस्तान, बांगलादेश, अफगणिस्तान मधील हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन मरणयातना सोसत आहेत. त्याच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांचे खून पडत आहेत. त्यांना या कायद्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळू शकते. माजी सैनिकांनी निवृत्तीनंतर समाजसेवेत यावे असेही आव्हान त्यांनी केले.

शिरूर तालुक्यामधील या पहिल्या कार्यक्रमात निवृत्त सैनिक डफळ यांचा वीर योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या पत्नी हेमलता डफळ मुलगी सोनाक्षी यांचाही सत्कार करण्यात आला. पुणे स्टेशन ते वडगाव शेरी येथील सैनिक डफळ यांच्या घरापर्यंत रॅलीद्वारे त्यांचे देशभक्तिपर गीत व घोषणा देऊन सन्मानाने स्वागत करण्यात आले.


या कार्यक्रमास वडगाव शेरी येथील नगरसेवक विशाल साळी, राष्टीय स्वयंसेवक संघाचे येरवडा भाग संघचालक प्रदीपजी नाईक, मे. विनायक डफळ, उद्योजग जयंत वाडेकर, वडगाव शेरी भाजपचे उपाध्यक्ष गणेश साकोरे, साईक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनात निचित, विक्रम निचित, मयूर शिवले, माजी सैनिक भरत घावटे, नानासाहेब शेंडगे, दादासाहेब कामठे, बाबासाहेब तारडे, जयसिंग नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी तर आभारप्रदर्शन अरविंद काळकुटे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या