अजित पवार मांडणार ६ मार्चला अर्थसंकल्प...

Image may contain: 1 person, closeup
मुंबई, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे.विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल.महाराष्ट्र विधिमंडळाचे आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार (ता.२४) पासून सुरू होणार आहे,अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एका शिक्षिकेला जाळून मारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातला महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरही या अधिवेशनात चर्चा होणार आहे.राज्यातल्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणारे विधेयकही सरकार या अधिवेशनात मांडेल जाणार आहे.विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

यावेळी बोलताना परब म्हणाले,या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्याचा निश्चित केला असून यात १८ दिवस कामकाज होणार आहे.गुरुवार (ता. ६)आर्थिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.तर (ता. २४) आर्थिक २०१९-२०२० च्या पुरवणी मागण्या तसेच आर्थिक वर्ष २०१४-२०१५ ,२०१५-२०१६ ,आणि २०१६-२०१७ या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील.

तसेच या अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे.त्याचबरोबर पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे,अशी माहिती परब यांनी दिली.या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,उद्योगमंत्री सुभाष देसाई,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या