'पावनखिंड' या चित्रपटाचे शूटिंग सुरु...

Image may contain: one or more people and text
मुंबई, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे.हा सगळा इतिहास केवळ पुस्तक रूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित शिवरथ यात्रा दरवर्षी प्रमाणे किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड अशी आयोजित करण्यात आली.त्याचा सांगता सोहळा एका दिमाखदार कार्यक्रमात रायगडावर संपन्न झाला.

लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून,छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित 'पावनखिंड' गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे.या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त नुकताच स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे किल्ले रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात व मंत्रोच्चाराच्या जयघोषात संपन्न झाला.

शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत,'शिवाजी महाराज की जय'च्या जयघोषात आणि मंत्रोच्चारात शिवपालखीचे पूजन करण्यात आले.'जंगजौहर' चित्रपटाची कलाकार टिमही त्यात उत्साहाने सहभागी झाली होती.काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

तसेच,बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारा 'जंगजौहर' या चित्रपटाची देखील पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.'आलमंड्स क्रिएशन्स'चे अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी 'जंगजौहर' चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली असून,जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या