चक्क रविवारीही शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालय उघडे...

Image may contain: indoor
शिक्रापूर, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): येथील ग्रामपंचायत कार्यालयात या पूर्वी सुट्टीच्या तसेच कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त सुरु ठेवून काही अफरातफर झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.त्याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी असून,त्याबाबत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.असे असून सुद्धा आज शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालय उघडे असल्याचे दिसून आले आहे.

आता रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामविकास अधिकारी यांच्या गैरहजेरीत ग्रामपंचायत कार्यालय उघडले गेल्याने शंका उपस्थित केली जात आहे.शिक्रापूर ही शिरूर तालुक्‍यातील मोठी ग्रामपंचायत आहे.त्या ठिकाणी यापूर्वी कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये काही गैरप्रकार झालेले असून त्याबाबत काही ग्रामपंचायत सदस्यांनीच गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे.

आज रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील ग्रामपंचायत कार्यालय उघडे होते.सभागृह देखील उघडे होते.यावेळी चार ग्रामपंचायत कर्मचारी येथे उपस्थित होते.मात्र ग्रामविकास अधिकारी,सरपंच,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नव्हते.काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात काही कागदपत्रांचे तसेच दप्तराचे गैरप्रकार झालेले असताना सुट्टीच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय व सांस्कृतिक सभागृह उघडले जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला.

ग्रामपंचायत कर्मचारी यांना विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी यांच्या आदेशाने आम्ही कार्यालय उघडले असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिटिंग सभागृह,ग्रामविकास अधिकारी कार्यालय,क्लार्क कार्यालय,सरपंच कार्यालय वेगवेगळे असून एका मजल्यावर विविध कार्यक्रम घेण्यासाठी देखील स्वतंत्र मोठे सभागृह आहे.

या बाबत यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि,शिक्रापूर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांना ग्रामपंचायत कार्यालय सुट्टीच्या दिवशी का सुरु होते याबाबत जाब विचारला जाईल.आणि त्या नंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.

शिक्रापूरचे ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांना या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि,गावातील काही नागरिकांना एक कार्यक्रम घ्यायचा होता.त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कार्यक्रम हॉल उघडून देण्यास सांगितले होते.संपूर्ण ग्रामपंचायत उघडण्यास सांगितली नहुती.यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास फक्त कार्यक्रमाचा हॉल उघडून देण्यासाठी सांगितले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या