पतीची संमती असल्यानेच त्याने विवाहितेवर केला बलात्कार...

Image may contain: text
पुणे, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पतीच्या संमतीनेच एकाने पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज परिसरात उघडकीस आला आहे.याप्रकरणी २५ वर्षीय विवाहित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी या प्रकरणी विवाहित महिलेचा पती व अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी विवाहित महिलेचा पती आणि सुरेश शैशराज शिंदे (वय ३४) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.असून सुरेश शिंदे याला अटक केली आहे.भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला कामानिमित्त कात्रज परिसरातील एका वसतिगृहात पतीसोबत राहत होती.त्याच वसतिगृहात काम करणारा आरोपी सुरेश शिंदे याने फिर्यादी महिलेच्या पतीच्या संमतीने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

विवाहित महिलेने हा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला असता विवाहित महिलेच्या पतीने असे उत्तर दिले कि,माझ्याच संमतीनेच त्याने तुझ्यावर बलात्कार केला.मीच त्याला तसे करण्यास सांगितले होते.असे उत्तर त्याने दिले.हे उत्तर ऐकून विवाहित महिलेला धक्काच बसला.नोव्हेंबर २०१९ मध्ये ही घटना घडली.फिर्यादी महिलेने तिच्या नातेवाईकांशी चर्चा करून अखेर भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली.याबाबत पोलिसांचे अधिक तपास सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या