पुणे रेल्वे स्थानकावर बसणार आणखी चार बॅग स्कॅनर...

Image may contain: one or more people and people standing
पुणे, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्‍न नेहमीच ऐरणीवर आला आहे.यावर उपाय शोधण्यासाठी स्थानकाच्या सुरक्षेत येत्या काळात वाढ करण्यात येणार असून,स्कॅनर मशीन्सचा वापर करण्यात येणार आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकच लगेज स्कॅनर मशीन आहे,मात्र ते बऱ्याचदा बंदच असते.तर प्लॅटफॉर्म एकवर येताना दोनच मेटल डिटेक्‍टर आहेत.

मेटल डिटेक्‍टर नसलेल्या ठिकाणाहून प्रवासी ये-जा करतात.यासह राजा बहादूर मिल रोड येथील प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्‍टरच नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.यावर रेल्वे सुरक्षा दलाकडून विशेष उपाययोजना करण्याचा 'प्लॅन' हाती घेण्यात आला आहे.परंतु, स्थानकाची मूलभूत सुविधाच सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.यावर उपाययोजना म्हणून रेल्वे सुरक्षा दलाकडून आणखी चार लगेज स्कॅनर मशीन बसवण्यात येणार आहेत.तर मेटल डिटेक्‍टरदेखील बसवण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सुरक्षा आयुक्‍त अरूण त्रिपाठी यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या