उल्हासनगर येथे तरुणीवर रिक्षाचालकाने केला विनयभंग...

No photo description available.
मुंबई, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून तरुणीला पेटवल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झालेला असताना,उल्हासनगरात धावत्या रिक्षात तरुणीची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने जीव वाचवण्यासाठी पीडित तरुणीने थेट धावत्या रिक्षाबाहेर उडी मारली.रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने घटनास्थळावरून पळ काढला असून CCTV फुटेजच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेने उल्हासनगरवासीय हादरले असून ठाण्याच्या स्वप्नाली लाड प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.सहा वर्षांपूर्वी ठाणे येथील कापूरबावडी भागात रिक्षाचालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वप्नाली लाड या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली होती.यामध्ये स्वप्नाली लाड ही तरुणी गंभीर जखमी झालेली स्वप्नाली २० दिवस कोमात होती.वर्षभर ती रुग्णालयात उपचार घेत होती.डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ती सुदैवाने बचावली.उल्हासनगरच्या सोमवारी घडलेल्या या घटनेने सहा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

उल्हासनगरातील २१ वर्षीय पीडित तरुणीने महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षा पकडली.रिक्षात आधीच २० ते २५ वयोगटातील तरुण चालकाच्या शेजारी तोंडाला मास्क लावुन बसलेला होता.रिक्षा सुसाट पुढे नेल्यानंतर त्याने विद्यार्थिनीची छेडछाड करण्यास सुरुवात केली.तिने रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितली.पण रिक्षाचालकही त्या तरुणांचा साथीदार असल्याने त्याने आणखीनच वेगाने रिक्षा पळवली.

त्या तरुणीने आरडाओरडा केला आणि दुनिचंद कॉलेजजवळ धावत्या रिक्षातून उडी मारली.यावेळी विक्षिप्त तरुणानेही रिक्षातून उडी मारून तिच्याशी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.मात्र पीडितेने आरडाओरड केल्यावर नागरिकांनी धाक घेताच तो तरुण रिक्षात बसून पळून गेला.याप्रकरणी धास्तावलेल्या पीडितेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून आरोपीला गजाआड करण्यासाठी रिक्षा संघटनेनेदेखील सहकार्य करावे,असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी केले आहे.

आजच्या काळात अल्पवयीन मुलीही सुरक्षित नाही.घोडबंदर येथील कासारवडवली भागात पाच वर्षीय मुलींवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.१२ वर्षीय मुलांनी तिला खेळायला नेत तिच्यावर अत्याचार केला.पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या