राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले...

Image may contain: Mangesh Shahajirao Pawar
पुणे, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): सगळ्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वामध्ये भाजप हा देशाची आपत्ती आहे.आणि ही आपत्ती घालवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे.ही लोकांची भावना आहे,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आज लोकांना आम्हा सगळ्यांकडून एका विचाराच्या कार्यक्रमाची आणि भूमिका मांडण्याची अपेक्षा आहे.

भाजपच्या पराभवाची ही आता सुरूवात झाली आहे.त्यांच्या पराभवाची मालिका थांबणार नसल्याचंही शरद पवार म्हणाले.याबाबत आता सगळ्या राजकीय पक्षामध्ये चर्चा सुरु आहे.भाजपचा दिल्लीत ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसलाय,असंही शरद पवार म्हणाले आहेत.देशात जाणिवपूर्वक धार्मिक कटूता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला.भाजपला पर्याय देणाऱ्या शक्तीला लोकांनी पाठिंबा दिला,असं शरद पवार म्हणाले आहेत.अरविंद केजरीवालांचं शरद पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या