गॅस दरवाढीचा सणसवाडी येथे जाहीर निषेध...

Image may contain: 15 people, including Shivajirao Walke, people smiling, people standing
शिक्रापूर, ता. १४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीचा सणसवाडी (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीच्या महिलांनी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा धिक्कार करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारने केलेली दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार,पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे,राष्ट्रवादी हवेलीच्या महिला अध्यक्ष लोचन शिवले,शिरूर महिला अध्यक्ष विद्या भुजबळ,संगीता शेवाळे,शोभा हरगुडे,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ हरगुडे,सुनीता दरेकर,दीपाली हरगुडे,नम्रता कांबळे,माधुरी वाळके,राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस पंडित दरेकर,शिरूर तालुकाध्यक्ष रवी काळे,माजी उपसरपंच शिवाजी दरेकर,माजी बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे,सोमनाथ दरेकर,किसन हरगुडे,माजी सरपंच नवनाथ हरगुडे,उत्तम दरेकर,सुभाष दरेकर,सुदाम दरेकर,विजय दरेकर यांसह आदी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या