तिसरे लग्न करणाऱ्या नवऱ्याला मंडपातच बसला चोप...

Image may contain: one or more people, people standing and outdoor
कराची, ता. १४ फेब्रुवारी २०२० : तिसरं लग्न करणाऱ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायकोने लग्नाच्या मंडपामध्ये घुसून त्याला मारहाण केली आहे.लग्नाचे विधी सुरु असताना पहिली बायको जबरदस्तीने मंडपात घुसली आणि नवऱ्याला प्रचंड मारहाण केली.दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली.मारहाण झालेला संतप्त नवरा पहिल्या बायको विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे.या नवऱ्याने पहिल्या पत्नी विरोधात लग्न मंडपात जबरदस्तीने घुसल्यामुळे आणि मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांकडून घटनेबाबत आणखी तपास सुरु आहे.पाकिस्तानातील कराची या ठिकाणी ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या मारहाणीत नवरोबा जबर जखमी झाला आहे आणि तो हल्लेखोर पूर्व पत्नी विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे.या करता त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.'पहिल्या बायको बरोबर आता माझा काहीही संबंध नाही.या प्रकरणाबाबत मी वकिलांशी बोलून तिला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे.'अशी प्रतिक्रिया त्याने स्थानिक मीडियाला दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्याचं कोणतही कारण या घटनेत नव्हतं.मात्र त्याच्या पहिल्या बायकोने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार तिच्या नवऱ्याने २०१८ मध्ये देखील सर्वांपासून लपवून दुसरं लग्न केलं होतं.आता तो त्याच प्रकारे तिसरं लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढला पण रंगेहात पकडला गेला,असंही ती म्हणाली.पाकिस्तानातील कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला दुसरं लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची लेखी स्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे.आता हे प्रकरण मिटवण्यासाठी दिवाणी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या