निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराजांना वाढता पाठिंबा...

Image may contain: 1 person
पुणे, ता. १५ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शैलीमुळे राज्यभर चांगलेच प्रसिद्ध आहेत.त्यांनी नुकतंच मुलगा आणि मुलीच्या जन्मा संदर्भात दिलेलं वक्तव्य वादात सापडलं असून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे.या सगळ्यात देखील इंदुरीकर महाराजांना चांगलाच पाठिंबा मिळताना दिसतोय.सोशल मीडियावर पोस्ट किंवा ट्विटच्या माध्यमातून देखील इंदुरीकर महाराजांना मोठा पाठिंबा दिला जातोय.सोशल मीडियावर अनेकजण इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.त्यांच्या पाठिंब्यासाठी काही ग्रुप देखील सुरु करण्यात आले असून यामध्ये सहभागी होणारांची संख्या लक्षणीय आहे.इंदुरीकर महाराजांची कीर्तन तसेच प्रवचन करताना प्रबोधन करण्याची एक विनोदी शैली आहे.


त्यांच्या या शैलीमुळे राज्यभरात त्यांचे लाखो चाहते तयार झाले आहेत.आज महाराजांवर टीका होत असताना यातील अनेक चाहत्यांनी त्यांच्या पाठराखण केल आहे.यामध्ये त्यांच्यावर टीका करणाऱ्या समाज सेवकांचा जोरदार समाचार घेतला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या