रांजणगाव गणपती येथे आजपासून कराटे स्पर्धा सुरु...

रांजणगाव गणपती, ता. १५ फेब्रुवारी २०२० (तेजस फडके): अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपती येथे द चँम्पियन कराटे क्लब च्या वतीने आजपासुन राष्ट्रीय स्तरावरील भव्य कराटे स्पर्धांची सुरवात झाली असल्याची माहीती क्लबचे अध्यक्ष शरद फंड यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना दिली.

   
कराटे स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असुन या स्पर्धेच्या माध्यमातून हजारो मुला-मुलींना कराटे खेळण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना ४ दुचाकी व १०० सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचे शरद फंड यांनी यावेळी सांगितले.

या स्पर्धेच्या उदघाटनसाठी कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार रोहित पवार,आमदार निलेश लंके,आमदार सुनील शेळके,माजी आमदार पोपटराव गावडे,बाबुराव  पाचर्णे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,जिल्हा परिषदेच्या सदस्य स्वातीताई पाचुंदकर,शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर  यांच्या सह विविध संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.ग्रामीण भागातील तरुणांना खेळामध्ये संधी उपलब्ध होण्यासाठी व स्वतःच्या सुरक्षेसाठी मुलींना कराटे चा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कराटे स्पर्धांचे हे दुसरे वर्ष असून यापुढे या स्पर्धा सुरू ठेवण्यात येणार असून शाळेतील मुलांनाही लाभ घेता यावा यासाठी शाळेतील मुलांना ही मोफत कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे शरद फंड यांनी यावेळी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या