अवघा महाराष्ट्र आपल्या पाठीशी : नितीन बानगुडे

पुणे, ता. १६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा आणि विषम तिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे महाराज व्यथित झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच त्यांनी या सर्व वादावर काल रात्री केलेल्या किर्तनात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं.मात्र मी जे बोललो,ते चुकीचं नाहीच.मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे.वादामुळे मला खूप त्रास होत आहे.एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन"असं इंदुरीकर म्हणाले आहेत."यूट्यूब वाले काड्या करतात.यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला.परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही",असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पाटील म्हणतात,इंदुरीकर महाराजांनी समाजाला काय शिकवले…?हुंडा घेणं पाप आहे.आपल्या आई बापाला विसरण पाप आहे.

आपली संस्कृती आणि परंपरा विसरण म्हणजे पाप आहे.दारू पिऊन धिंगाणा घालणं पाप आहे.गाईला कसायाच्या हाती कापायला देणं पाप आहे.आपल्या पवित्र धर्माला विसरण पाप आहे.आपल्या साधू संतांना विसरण पाप आहे.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना विसरण पाप आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान विसरण पाप आहे.स्त्रियांवर अत्याचार करणं पाप आहे.एका बाजूला मिडिया तर दुसऱ्या बाजूला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने महाराजांच्या विरोधात रान पेटविले आहे.यावर आता प्रसिद्ध व्याख्याते आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.फेसबुकवर पोस्ट लिहून पाटील यांनी महाराजांना कीर्तन न सोडण्याचा सल्ला दिला आहे.महाराज आपण कीर्तन सोडू नये,आपण कीर्तन सोडले तर महाराष्ट्राचे सामाजिक नुकसान होईल,आयुष्यात अनेकदा कौतुक होत असते,त्याप्रमाणे टीका देखील होणार.आम्हाला खात्री आहे आपला उद्देश आणि हेतू चांगलाच आहे त्यामुळे आपण थोडा काळ संयम ठेवायला हवा.महाराज संपुर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे असं नितीन बानुगडे पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान याबाबत बोलताना ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांनी जे वक्तव्य केलं आहे ते गुरुचरित्रात आहे.मग ते बोलले त्यात चुकीचं काय आहे,असं म्हणत माजी मंत्री सुरेश धस यांनी महाराजांचं समर्थन केलं आहे.तसेच इंदुरीकरांवर कारवाई केली तर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही ते म्हणाले आहेत.कुणी काही बोलले म्हणून महाराजांना नोटीस पाठवली असेल तर सरकारच्या अकलीची किव येते,अशी टीकाही धस यांनी केली आहे

इंदुरीकर महाराज जे बोलतात ते आपल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे.त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही,असंही ते म्हणाले आहेत.दरम्यान,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील म्हणाले की,इंदोरीकर महाराजांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी समर्थन दिलं आहे.इंदूरीकरांनी आपलं काम सुरू ठेवावं आम्ही आपल्या सोबत आहोत.भूंकणारे भूंकत राहतील पण आपण कीर्तन बंद करू नये.अशी विनंती ही रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे.याच मुद्द्यावरून आता राजकारण सुरु झाले असून इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका देखील होत आहे.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील इंदुरीकर यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.

अहमदनगर येथील श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडलं.तसंच पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपरे,पोपटराव पवार आणि जहीर खान यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली.पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवली जाणं दुर्दैवी असून किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे.माझी श्रद्धा आहे.पण अंधश्रद्धा नाही.यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलोय.


पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे,असं परखड भाष्य बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय.तर दुसऱ्या बाजूला तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा महाराजांवर हल्लाबोल केला असून,आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही.तो संविधानानुसार चालतो. इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.असल्याचे म्हंटल आहे.मात्र शेती करताना तरी इंदोरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे.त्यांनाही जर अपमानास्पद बोलाल तर स्वतःच्या शेतातही काही दिवसांनी काम करता येणार नाही.अशी तुमची गत होऊ शकते,अशी टीकाही यावेळी देसाई यांनी केली आहे.

दरम्यान,राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 'महाराष्ट्र देशा' शी बोलताना इंदुरीकरांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.कोणताही कीर्तनकार,प्रबोधनकर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देत असतो.मात्र इंदुरीकर महाराज आपल्या प्रबोधनातून महिला मुलींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद टीका करत असतात.आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे.या परंपरेतून त्यांनी चांगले विचार समाजात रुजवायला पाहिजेत.मात्र प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी संतांचा विचार मांडला पाहिजे असं म्हटलं आहे.

'पुढे बोलताना त्या म्हणाल्या,तसेच इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून स्त्री-जन्माचा विचार समाजात रुजवायला पाहिजे.त्याचबरोबर पुरुषांमध्ये हि स्त्रियांचा सन्मान आणि आदर राखण्याचा विचार मांडायला हवा.स्त्री जन्माची धुरा त्यांनी समाजात रुजवणे गरजेचे आहे.मात्र त्यांच्यावर टीका झाली म्हणून त्यांनी कीर्तन सोडण्याची गरज नाही,असेही त्यांनी महाराष्ट्र देशा'ला यावेळी सांगितले आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या