शिक्रापूर नशेत चढला हाय होल्ट विद्युत मनोऱ्यावर अन्...

Image may contain: sky
शिक्रापूर, ता. 18 फेब्रुवारी 2020 (शेरखान शेख) : येथील कासारी फाटा जवळील ताजणे वस्ती येथील सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीने नशेच्या भरात पत्नीला मारहाण केली. त्यांनतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती चक्क शंभर फुट अति उच्चदाबाच्या विद्युत मनोऱ्यावर चढल्यामुळे सर्वांची धांदल उडाली.शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ताजणे वस्ती येथील विलास सोपान ताजणे याने नशेच्या गोळ्या घेऊन पत्नीला मारहाण केली. त्यांनतर त्याची पत्नी रुपाली ताजणे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. विलास ताजणे नशेच्या भरात हातामध्ये काठी आणि लोखंडी साखळी घेऊन चक्क येथील शंभर फुट उंच असलेल्या सातशे पासष्ट केव्ही अशा उच्च दाबाच्या विद्युत मनोऱ्यावर चढला. त्यांवेळी तेथे मोठा जनसमुदाय उपस्थित झाला. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी तेथील सर्व विद्युत प्रवाह संबंधित अधिकाऱ्यांना सांगून बंद केला. त्यांनतर विलासला खाली उतरण्यासाठी विनंती करून देखील तो खाली उतरेना. अंधार झाला अखेर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक दलाच्या जवानांना बोलाविण्यात आले. परंतु, त्यांना देखील अपयश आले. पुन्हा तो उंच जात होता. यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार दत्तात्रय होले, पोलिस नाईक हरिष शितोळे, ट्राफिक वार्डन अंतेश्वर यादव आदींनी सर्व नागरिकांना बाजूला करून पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याच्याशी चर्चा करत त्याला खाली येण्याची विनंती केली. अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास विलास हा खाली उतरला आणि त्यांनतर पळू लागला. पोलिस व नागरिकांनी त्याला पकडून त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांचे कौतुक...
शिक्रापूर येथे उच्च दाबाच्या विद्युत मनोऱ्यावर चढलेल्या इसमाला खाली घेण्यासाठी पन्नासहून अधिक लोकांनी प्रयत्न केले. अग्निशमक दलाच्या जवानांना देखील काही करता आले नाही. परंतु, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी स्वतः त्या मनोऱ्या खाली उभे राहून सर्व नागरिकांना बाजूला करून त्याच्याशी एकटे मोठमोठ्या ओरडून चर्चा करून त्याला खाली येण्यास सांगितले. अखेर साडेनऊला तो खाली आला. त्यामुळे जे पन्नास जणांना जमले नाही ते एकटे माळी यांनी करून दाखविले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांचे सर्वांनी कौतुक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या