अजय देवगनमुळे या अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न...

Image may contain: 3 people, selfie and closeup
मुंबई, ता. १८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): कोणाही व्यक्तीशी असणारं नातं हे अमुक एका वळणावर आल्यानंतर त्या नात्यात असे प्रसंगही येतात.जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते.आता ही परिस्थिती नेमकी कशी हाताळावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं.सेलिब्रिटी वर्तुळात नात्यामध्ये उदभवणारी ही परिस्थिती अनेकदा काही टोकाच्या भूमिकांना वाव देत असल्याची उदाहरणंही पाहायला मिळाली आहेत.सेलिब्रिटीं रिलेशन शिपच्या याच चर्चेमधील एक बहुचर्चित प्रकरण म्हणजे अभिनेता अजय देवगन आणि रवीना टंडनचं नातं असं म्हटलं जातं की,अजय देवगन आणि रवीना टंडन यांच्या नात्याची कला विश्वात एकेकाळी बरीच चर्चा होती.काजल आणि अजयच्या नात्यापूर्वी रवीना सोबतचं अजयचं नातं कला विश्वात लक्ष वेधत होतं.इथे महत्त्वाची बाब ही,की जिथे रवीना अजयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तिथेच अजय मात्र वेगळ्या भूमिकेत होता.

असं म्हटलं जातं की,अजयवरील प्रेमापोटी रवीनाने आतम्हत्येचाही प्रयत्न केला होता.'दिलवाले'या चित्रपटाच्या वेळी रवीना अजयच्या प्रेमात पडली होती.पण,हे नातं सुरुवातीलाच संपलं होतं.कारण त्याच दरम्यान अजय कोणा दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात होता.ती मुलगी म्हणजे करिष्मा कपूर.करिष्मासाठी अजयचं प्रेम पाहून रवीनाला ही बाब सहन झाली नाही.


अजयने आपल्याला फसवल्याचा दावाही रवीनाने केल्याचं म्हटलं जातं.पण,तिने हे सार काही प्रसिद्धीसाठी केल्याचं अजयने सांगितलं होतं.किंबहुना अजय देवगणने रवीनासोबत असलेली मैत्रीही नाकारली होती.त्यांच्यामध्ये असलेली हि नात्यांची गुंतागुंत वाढली आणि गोष्टी पाहता पाहता चित्र पूर्णपणे बदललं त्याला नवं वळण मिळालं.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या