सासरच्या जाचाला कंटाळून गायिकेची आत्महत्या...

Image may contain: 1 person, closeup
मुंबई, ता. १८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): हुंड्यासाठी महिलांचा होणारा छळ थांबण्याचं नाव घेत नाही आहे.केवळ काही पैशांसाठी महिलांचा अमानुषपणे छळ केला जातो.त्यांना मारहाण केली जाते.आणि या छळाला कंटाळून अनेकदा महिला आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात.केवळ सामान्य महिलाच नाही तर या जाचाला कलाकारांनाही सामोरं जावं लागतं.याच जाचाचा बळी ठरली कन्नड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका सुष्मिता.नवऱ्याच्या त्रासाला आणि घरगुती हिंसाचाराला कंटाळून सुष्मिताने आत्महत्या केली आहे.हुंड्यासाठी सुष्मिताचा तिच्या नवरा आणि कुटुंबियांकडून छळ व्हायचा.आणि या छळाला कंटाळून सुष्मिताने आपलं आयुष्य संपवलं आहे.सुष्मिताने आत्महत्या करण्याआधी आपल्या आईला व्हाट्सअप  वॉईस मेसेज पाठवला होता.त्यानंतर तिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. सुष्मिता ही केवळ २६ वर्षांची होती.सुष्मिताने कन्नड सिनेसृष्टीत नाव कमावलं होतं.मात्र यशाच्या शिखरावर असतानाच तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.शरत कुमार याच्याशी सुष्मिताचं लग्न झालं होतं.तो एका खासगी कंपनीत काम करत होता.

शरत आणि शरतचं कुटुंब सुष्मिताचा हुंड्यासाठी छळ करत असत. सुष्मिताने आत्महत्या करण्याआधी तिच्या आईला एक व्हॉईल मेसेज पाठवला होता.त्यामध्ये ती अशी म्हणाली की,'मला माफ कर,मला माझा चुकांची शिक्षा मिळत आहे.माझा नेहमी छळ केला जायचा.ते मला नेहमी घर सोडून जायला सांगायचे.त्यांना सोडू नकोस.शरत,वैदेही आणि गीता माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत.मी त्यांना नेहमी विनवणी केली मात्र त्यांना कधीच माझी दया आली नाही.


'पुढे सुष्मिता असं म्हणाली की,'लग्न झाल्याच्या दिवसापासूनच या छळाला सुरुवात झाली.पण मी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही.आपल्या घरी माझ्या भावाच्या हातांनी माझे अंत्यसंस्कार कर. माझ्या सासरच्यांना सोडू नकोस नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.मला तुमची खूप आठवण येईल.'सुत्रांच्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी सुष्मिता आणि शरतचं लग्न झालं होतं.मात्र लग्नाच्या काही दिवसातच सासरच्यांनी सुष्मिताच छळ करायला सुरुवात केली. सुष्मिताने सुप्रसिद्ध कन्नड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या