शिवनेरीवर मुखमंत्र्यांनी केलं हे विधान...

Image may contain: 1 person, sitting
शिवनेरी, ता. १९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): उद्धव ठाकरे आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो.तेव्हा एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता.दादांना सांभाळा.त्यावर मी आता उत्तर देतो.अहो अजितदादा आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली.इतकी वर्षे वेगळं राहिलो.आधीच एकत्र यायला हवे होते.आता जे एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत.आता जे चांगलं आहे ते करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे ही भावना आज प्रत्येक गोर-गरीबांच्या मनात निर्माण झाली आहे.त्यामुळेच आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्याला गर्दी झाली आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.उद्धव ठाकरे हे भाषण करत होते.त्याचवेळी जमलेल्या गर्दीपैकी एकजण ओरडून म्हणाला ते शिवस्मारकाचे लवकर बघा.त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले होय सगळं बघतो.


आज लोकांचं सरकार आलेलं आहे.त्यामुळे काळजी करु नका.शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत.हे आपलं वैभव आहे"असंही उद्धव ठाकरे म्हणाले.शिवनेरी किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी २३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं.तसंच शिवनेरीवरील गर्दी पाहता महाराष्ट्रात आता रयतेचं राज्य आल्याचं स्पष्ट होतंय,असंही अजित पवार म्हणाले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या