नागराज मंजुळे बनवणार शिवरायांच्या जीवनावर ३ चित्रपट...

Image may contain: 1 person, sitting
मुंबई, ता. १९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवरायांच्या जीवनप्रवासावर ३ सिनेमे बनवणार असल्याची घोषणा नागराज मंजुळेनं केली आहे.आज शिवजयंतीनिमत्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.


दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख चित्रपट बनवणार असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरु होती.नागराजनेच या चित्रपटाच्या घोषणेचा टीझर ट्विट केला आहे'आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख,अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी.


शिवाजी,राजा शिवाजी,छत्रपती शिवाजी (हा चित्रपट),'असे म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे.'अभिमानाने सादर करत आहोत… तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या….जय शिवराय,'असं ट्विट अभिनेता रितेश देशमुख याने केलं आहे.शिवरायांचा इतिहास उलगडणारी ही 'शिवत्रयी' दिग्दर्शक नागराज मुंजुळे,प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या संकल्पनेतून रूपेरी पडद्यावर अवतरणार आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या