कराटे स्पर्धेत घेतला हजारो खेळाडूंनी सहभाग...

रांजणगाव गणपती, ता. 21 फेब्रुवारी 2020: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 21 वर्षांखालील गटात कीर्तिवंत वाघ, तर तेजस्वी वाळुंज यांनी विजेतेपद पटकावले असून, 21 वर्षांवरील गटात महेश डेंगळे व सृष्टी मोरे यांनी विजेतपद मिळविले आहे.


रांजणगाव गणपती येथे "द चॅम्पियन कराटे क्‍लब'तर्फे दोनदिवसीय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा झाली. यामध्ये राज्यातील सुमारे 1 हजार 969 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्‌घाटन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी सभापती प्रकाश पवार, विश्वास कोहकडे, शेखर डाळिंबकर, केशर पवार, सविता परहाड, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर, सदाशिव पवार, शिवाजीराव शेळके, उपसरपंच अजय गलांडे, शरद फंड व ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पर्धेचे संयोजन शरद फंड, हरीश पाचुंदकर, सागर तनपुरे, तेजस शेळके, गणपत सोनटक्के, निखिल लांडे, सागर फंड, ईश्वर दरवडे, सोमनाथ धुमाळ, आदित्य शेळके, सान्वी शेळके, वृषाली गाजरे, प्राची कोंडकर आदींनी केले. 21 वर्षांखालील विजेता कीर्तिवंत वाघ ठरला असून, त्याला दुचाकी व चषक आणि उपविजेता राजन शिंदे यास 25 हजार रुपये व चषक देण्यात आला. तसेच, 21 वर्षांवरील विजेता महेश डेंगळे ठरला असून, त्याला दुचाकी व चषक आणि उपविजेता ओंकार पायगुडे ठरला असून, त्याला 25 हजार व चषक देण्यात आला. 21 वर्षांखालील मुलींच्या गटात विजेती तेजस्वी वाळुंज ठरली असून, तिला दुचाकी व चषक आणि उपविजेती दीप्ती कळसे हिला 15 हजार रुपये व चषक देण्यात आला आहे. तसेच, 21 वर्षांवरील गटात सृष्टी मोरे ठरली असून, तिला दुचाकी व चषक आणि उपविजेती स्नेहल भिसे हिला 15 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.


युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करावा. उत्तम आरोग्यासाठी रोज नियमित व्यायाम करावा. प्रत्येकाने स्वरक्षणासाठी पुढे आले पाहिजे, त्यासाठी कराटे स्पर्धेतून समाजप्रबोधन होणे काळाची गरज आहे, असे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या