Good News: रांजणगाव गणपतीपर्यंत मेट्रो आणणार...

Image may contain: 1 person, train
रांजणगाव गणपती, ता. 21 फेब्रुवारी 2020: पुणे-नगर रस्त्यावरील सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिक्रापूरपर्यंत येणारी मेट्रो रांजणगाव गणपतीपर्यंत आणणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येत असल्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. कोल्हे म्हणाले, "पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तिसऱ्या टप्प्यांत शिक्रापूरपर्यंत येणारी मेट्रो रांजणगाव गणपतीपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येतं आहे. अष्टविनायक मार्गाचे काम प्रगतिपथावर असून, या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्व पाठ्यपुस्तकात यायला हवा, याकरिता सरकारकडे आग्रही मागणी केली आहे.''


दरम्यान, महागणपतीपर्यंत मेट्रो येणार असल्यामुळे भाविकांचा मोठा वेळ वाचण्याबरोबरच वाहूतक कोंडीही कमी होण्यास मदत होईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या