येत्या ८ दिवसात या पदांसाठी भरती सुरू...

No photo description available.

पुणे, ता. २१ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पुणे जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांची शिक्षक भरतीची कार्यवाही येत्या ८ दिवसात करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या सूचनेचे पत्र पाठविण्यात आले आहे.त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तसेच ग्रामविकास मंत्र्यांनी शिक्षकांच्या पदभरतीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत,जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गीय उर्वरीत ५० टक्के पदे भरण्याची कार्यवाही ८ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार जिल्हा परिषदेची बिंदु नामावली अद्यावत असल्याचे शासनास तात्काळ कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय प्रवर्गाची शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सांगून,२०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय रिक्त पदांमधून केवळ मराठी माध्यमांची ५० टक्के प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत.त्यावेळी जिल्हा परिषदेतील बिंदू नामावली (रोस्टर) अद्यावत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे सीइओ ना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.तसेच सद्यस्थितीत बिंदु नामावलीनुसार प्रवर्ग निहाय मागासवर्गीयांची प्रत्यक्षात किती पदे आहेत त्याचा प्रवर्ग निहाय तपशील शासनास तात्काळ सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे म्हणाले,जिल्ह्यात ३२ मागासवर्गीय शिक्षकांची पदे रिक्त असून,त्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार भरती करण्यात येईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या