रांजणगाव पोलिसांची वेश्या व्यवसायावर कारवाई...

Image may contain: one or more people, shoes and indoor
रांजणगाव गणपती, ता. २१ फेब्रुवारी २०२० (तेजस फडके): रांजणगाव पोलीस स्टेशनच्या परीसरात अवैधरीत्या वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहीती ग्रामीण पोलिसांना मिळाल्याने रांजणगाव पोलिसांच्या मदतीने हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी गुरुवारी (दि २०) रोजी रात्री उशिरा छापा टाकून धडक कारवाई करत पश्चिम बंगाल येथील ५ पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुखरूप सुटका केली.तसेच वेश्याव्यवसाय करण्यास परावृत्त केल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

रांजणगाव,कारेगाव परीसरात अनेक हॉटेल व धाबे आहेत.यातील काही हॉटेलवर वेश्या व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो.याबाबत बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना गोपनीय माहीती मिळाल्याने त्यांच्या पथकातील अधिकारी व स्टाफ तसेच रांजणगाव पोलिसांनी हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता.त्यांना तेथे अवैधरित्या ५ परप्रांतीय महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे निदर्शनास आले.वेश्याव्यवसाय करण्यास परावृत्त केल्या प्रकरणी १) महेश उर्फ बापुण, २) सुमित साहू, ३) संदीप बळवंत येंधे, (रा.आंबेगव्हाण) ता.जुन्नर जि.पुणे ४) राजू पित्तवास साहू, (रा.तालचेर) डीकानाल ओडिसा ५) संतोष लोकनाथ बेहरा, (रा.गुरु जंगली) डीकानाल ओडिसा ६) नारायण संजय दुधाटे, (रा.उमरखडी देऊळगाव) ता.पालम जि.परभणी ७) राकेश उर्फ लूफताद रहमान शेख या ७ जणांविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांना मा. कोर्टात हजर करण्यात आले.या ४ जणांना सोमवार (दि २४) रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन पीडित महिलांना महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.


सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्य्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलीस नाईक अजित भुजबळ,पोलीस नाईक मंगेश थिगळे,पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळनोर,महिला पोलीस कॉन्स्टेबल राधिका वायाळ,मोनिका वाघमारे,शुभांगी पवार यांनी तसेच बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस जवान सुरेंद्र वाघ,संदीप जाधव,स्वप्निल अहिवळे,शर्मा पवार,विशाल जावळे,आरसीपी पथकातील  महिला पोलीस जवान मंगल बनसोडे व मेघा इंगळे यांनी कारवाई केली.पुढील तपास सहाय्य्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम हे करत आहेत.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या