या गावात महाशिवरात्री निमित्त श्रीनाथ मंदिरात यात्रा...

Image may contain: 1 person, flowerतळेगाव ढमढेरे, ता. २२ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरली होती.गावातील ग्रामदैवत श्रीनाथ मंदिराच्या बाजूला शिवमंदिर आहे.महाशिवरात्रीच्या निमित्ताने गावातील व परिसरातील भक्तांनी हजारोंच्या संख्येने भाविक पहाटे पासून दर्शन रांगेत उभे राहून शिवालयात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले.


तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत.त्यापैकी ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून रांगा लागल्या होत्या.या यात्रेनिमित्ताने फिरते पाळणे,खेळण्यांची दुकाने,प्रसादचे दुकाने,मिठाईवाले यांची सर्व दुकाने सजली होती.शिरूर तालुक्‍यातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.लहान मुलांना घेऊन दर्शनाला महिला देखील आल्या होत्या.


सकाळी ग्रामस्थांच्या वतीने शिवलिंगास महाभिषेक घालून महापूजा करण्यात आली होती.पहाटेपासून भाविकांनी दर्शनास सुरुवात केली होती.गावकऱ्यांनी रात्रभर जागर करत देवाचे नामस्मरण करत भजने केली.सकाळी काकडाआरती करण्यात आली.दुपारच्या वेळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना उन्हाच्या झळा लागत होत्या.आज परिसरातील भाविकांची दर्शनासाठी,खरेदीसाठी गर्दी झाली होती.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या