श्री मल्लिकार्जुन कावड मिरवणूक...

Image may contain: 10 people
न्हावरे, ता. २२ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन कावड सोहळा महाशिवरात्र उत्सवानिमित्त ढोल ताशांच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषात रांजणगाव सांडस-वाळकी संगम बेट येथील श्री संगमेश्‍वराकडे प्रस्थान झाले.सकाळी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्रींचा महाभिषेक पार पडला.त्यानंतर श्री मल्लिकार्जुन कावड मिरवणूक सोहळ्याला सुरूवात झाली.याप्रसंगी परिसरातील भक्तजन उपस्थित होते.शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीही श्री मल्लिकार्जुन महाराजांचे दर्शन घेतले.श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळाचाही सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला.परिसरातील भाविकांनी श्री मल्लिकार्जुनचे दर्शनासाठी गर्दी केली होती.बेबी बोथरा यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते विकासशेठ बोथरा यांच्या वतीने दिवसभर भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आले.


तसेच लोकसेवा पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या वतीने उपवासाचे फराळाचे वाटप करण्यात आले.रात्री येथीलच रानातील महादेव मंदिरात कल्याण महाराज काळे यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.तेथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या