कार दुभाजकास धडकून २ ठार ५ जखमी...

Image may contain: text that says 'Accident'
कोपरगाव, ता. २२ फेब्रुवारी २०२० : शिर्डीतून साईदर्शन घेवून येत असलेल्या कारवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर जावून धडकली.या अपघातात २ जण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.पाचही जखमी गंभीर असल्याने त्यांना साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.हा अपघात शिर्डी-मनमाड रस्त्यावर जंगली महाराज आश्रमाजवळ शुक्रवारी सकाळी ८:३० च्या सुमारास झाला.


कारमध्ये असलेले सर्व प्रवासी खरगोण जिल्हा मध्यप्रदेश येथील होते.गाडीचा वेग एवढा जोरात होता की कार दुभाजकाला धडकल्यानंतर पलटी झाली.त्यात सना करेलु सोनगीर (वय ४०) व देवांशी सोनवे (वय ५) हे दोघे जागीच ठार झाले तर अरुणा कडवायजी खेडेकर,सारिका सोनगीर,शितल सोनगीर,लक्ष्मी,रुक्‍मिणी सोनगीर (नांव पूर्ण समजले नाही) (सर्व रा.धनपायडा ता.बडवा जि.खरगोण मध्यप्रदेश) हे सर्व जखमी झाले.

सकाळी ८:३० च्या सुमारास बसकर मिथुन खेडेकर (रा. धनपावडा ता. बडवा जि. खरगोण मध्यप्रदेश) हे त्यांचे कुटूंबासह स्वत:च्या कार (नं. MP. ९ BP ०४९४) मधुन शिर्डी येथील श्री साईबाबांचे दर्शन घेवून मनमाडकडे जात असतांना जंगली महाराज आश्रमाजवळ आले असता कार अतिशय भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार तेथील रस्त्या दुभाजकावर जावून आदळली.


अपघात एवढा भीषण होता की,कार दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्याखाली सर्व प्रवासी दाबले गेले.या जखमींना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून कार चालक मन्साराम कुंवरसिंग तंवर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस हेड कॉन्स्टेबल ए.व्ही.गवसणे पुढील तपास करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या