Video: कोनशिला वाहण्यासाठी अँब्युलंसचा वापर...

Image may contain: one or more people and outdoor
कारेगाव, ता. २३ फेब्रुवारी २०२० (तेजस फडके): कारेगाव (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.परंतु या उदघाटनासाठी बसविण्यात येणाऱ्या दगडी कोनशिला वाहुन नेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या अंब्युलन्सचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कारेगाव ग्रामस्थ संतप्त झाले असून औदयोगिक वसाहतीतून मिळणारा करोडो रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीकडे असताना कोनशिला वाहण्यास दुसरे वाहन उपलब्ध नव्हते का...? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीक विचारत आहेत.


कारेगाव (ता.शिरुर ) येथे आज (दि २३ ) रोजी अंदाजे १५ कोटींच्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या उदघाटनाच्या कोनशिला विविध ठिकाणी बसविण्यासाठी न्यायच्या होत्या. त्या कोनशिला वाहण्यासाठी ग्रामपंचातीची अँब्युलंस वापरण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट उघडकीस आली. अँब्युलंसचा वापर हा अत्यावश्यक सेवेसाठी असतो.परंतु कारेगाव ग्रामपंचायतीने कोनशिला वाहण्यासाठी अँब्युलंसचा वापर केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तसेच कोनशिला बसविण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या भिंती शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते.त्यामुळे इतक्या घाईघाईने विविध विकासकामांची उदघाटने करण्याचे नेमके कारण काय असा यक्षप्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.


याबाबत गावातील ग्रामसेवक भाकरे यांना विचारले असता www.shirurtaluka.com शी बोलताना त्यांनी सांगितले की, मी मुंबईला असुन झालेल्या प्रकाराबद्दल मला काहीच माहीत नाही. कारेगावचे सरपंच अनिल नवले यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, गावातील काही ठिकाणी कोनशिला तातडीने न्यायच्या होत्या. त्यावेळेस कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोनशिला अँब्युलंस मधुन नेण्यात आल्या. परंतु आम्ही कोणत्याही रुग्णाला थांबवून अँब्युलंसचा वापर केलेला नाही.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या