स्वच्छता हि काळाची गरज: जयश्री भुजबळ

तळेगाव ढमढेरे, ता. २४ फेब्रुवारी २०२० (आकाश भोरडे): सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे असून स्वच्छता हि आजच्या काळाची गरज असल्याचे मत शिक्रापूरच्या सरपंच जयश्री भुजबळ यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता.शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात संत निरंकारी सत्संग यांच्या वतीने सद्गुरू बाबा हरिदेव सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या

संत निरंकारी मंडळाचे सेवेकरी करत असलेले काम हे मनापासून करत असून स्वच्छता म्हणजे देशाची सेवाच असल्याचे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद यांनी सांगितले.संत निरंकारी सत्संगच्या वतीने संपूर्ण भारतील आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून आम्ही शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयचा परिसर स्वच्छ करून आमच्या सेवेकऱ्यांच्या मदतीने साफसफाई करत असल्याचे संत निरंकारी सत्संग शिक्रापूर प्रमुख जयराम सावंत यांनी सांगितले.संत निरंकारी सत्संगचे शिवाजी जगताप यांनी आभार मानले.

यावेळी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद, डॉ. सोनाली देवकर, शिवाजी जगताप, डॉ. शशिकांत भवर, डॉ. स्वाती झगडे, संत निरंकारी सत्संग शिक्रापूर प्रमुख जयराम सावंत,उद्योजक भाऊसाहेब कापरे,स्वाती फडतरे, चैतन्य गांजे, प्रवीण सरोदे, अरुण धुमाळ, प्रवीण गोसावी, अनिल शिंदे, लक्ष्मण कळमकर यांसह आदी सेवेकरी तसेच मान्यवर व ग्रामीण रुग्णालय शिक्रापूरचे कर्मचारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या