मोलकरीण स्वतःच्या लघवीने धुवायची भांडी...

Image may contain: food
लखनौ (उत्तर प्रदेश), ता. 25 फेब्रुवारी 2020: एक मोलकरीण स्वतःच्या लघवीने भांडी धुवत असल्याचा धक्कादायक प्रकार गाजियाबाद येथे सीसीटीव्हीमुळे उघड झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गाजियाबाद शहरातील इंदिरापुरम इथल्या रहिवासी इमारतीत ही महिला अनेक घरांमध्ये मोलकरणीचे काम करत आहे. यातील एका फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवला आहे. दोन दिवसांपूर्वी या घरमालकाने ऑफिसवरून परतल्यानंतर सहज सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेंव्हा त्यात चित्रीत झालेला प्रकार पाहून त्यांना धक्का बसला.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची मोलकरीण तिच्या लघवीने घरातील भांडी धूत असल्याचे दिसून आले. ही महिला आधी घरातली सर्व भांडी घासून धुवून घेत होती आणि मग एका भांड्यात लघवी करून त्यात ती धुतलेली भांडी पुन्हा धूत होती. ही मोलकरीण जवळपास दोन वर्षं या फ्लॅटमध्ये काम करत होती. त्यामुळे तिने केलेल्या या कृत्याचे फुटेज पाहून धक्का बसलेल्या या घरमालकाने तिच्याकडे या प्रकाराची विचारणा केली. मात्र, तिने असे काही केलेच नसल्याचे सांगितले. तेव्हा घरमालकाने थेट पोलिस चौकी गाठत मोलकरणीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला.



दरम्यान, सदर रहिवासी संकुलात या प्रकरणाविषयीची माहिती मिळाल्यानंतर इतर रहिवासी संतापले आणि तिच्या अटकेची मागणी करू लागले. ही मोलकरीण अन्यही घरात काम करते. पण त्या घरात तिने असे काही केल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या