शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या केबिनमध्ये खळ्ळ खट्याक्‌...

Image may contain: 10 people, people standingशिरूर, ता. 25 फेब्रुवारी 2020: अधीक्षक देता का अधीक्षक', "ग्रामीण रुग्णालय व्हेंटिलेटरवर', "अधीक्षक पगारी, रुग्णालयाची बेकारी' असे फलक गळ्यात अडकवून शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी निदर्शने केली. शिवाय, वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनमध्ये खळ्ळ खट्याक्‌ करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे टळला.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सतत गैरहजर असतात. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांना काम करताना मर्यादा येत असून, त्यांच्यावरील ताण वाढतो. पर्यायाने आरोग्य सुविधेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक द्यावा, अशी मागणी मनसेने लावून धरली होती. याबाबत दखल घेतली जात नसल्याने मनसैनिकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर निदर्शने केली. मनसैनिकांनी अधीक्षकांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या खुर्चीची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. फौजदार सुनील मोटे, पोलिस हवालदार संतोष कदम व सुदाम खोडदे यांनी हस्तक्षेप केला. त्या वेळी खुर्चीला हार घालण्यात आला.मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे, संदीप कडेकर, बंडू दुधाणे, ललित गुगळे, शैलेश जाधव, विकास साबळे, आकाश लोहार, सुनील जाधव, अथर्व आढाव, साहिल काटे आदींनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात घोषणाबाजी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या