भांड्याचा आवाज झाला आणि समोरच दृश्य पाहून...

Image may contain: 6 people, people standing
शिंदोडी, ता. २५ फेब्रुवारी २०२० (तेजस फडके): दुपारची १२ ची वेळ घरातली काम आवरून दिपाली ढेपे घरात निवांत बसल्या होत्या.अचानक मोबाईल खणखणला तो फोन त्यांचे पती राहुल यांचा होता. त्यांनी मोबाईल उचलला आणि त्या बोलू लागल्या.तेवढ्यात किचन रूममधून भांडी पडल्याचा आवाज आला.म्हणून त्या किचन रूमकडे वळल्या आणि समोरील दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली.कारण किचन मध्ये ७ फूट लांबीचा साप होता.त्यांनी हि गोष्ट लगेचच आपले पती राहुल यांना सांगितली.


राहुल यांनी तातडीने एका मित्राला फोन करून शिरुरचे सर्प मित्र निलेश पाठक यांच्याशी संपर्क साधला.त्या नंतर पाठक यांनी तांदळी येथील रेस्क्यू टीम चे सदस्य व सर्प मित्र सुनील कळसकर यांचा नंबर राहुल ढेपे यांना दिला.ढेपे यांनी सर्पमित्र कळसकर यांना फोन करून घरात साप शिरल्याचे सांगितले.त्यानंतर तब्ब्ल १ तासाने सर्प मित्र सुनील कळसकर आणि सर्प मित्र मनोहर शिंदे यांनी पिवळ्या रंगाच्या ७ फूट धामीणीला सुखरूप पकडले.या पकडलेल्या धामिनीला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात येणार आहे.

घरात साप शिरल्याचे लक्षात आल्यावर दिपाली ढेपे या प्रचंड घाबरल्या.त्यानंतर त्यांनी आपले पती राहुल यांना हि बाब फोन करून सांगितल्यावर राहुल यांनी प्रथम आपले मित्र गणेश भोस यांना मदतीसाठी बोलावून घेतले.त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाल्याने व आरडाओरडा झाल्याने साप किचन रुममध्येच अडचणीच्या ठिकाणी लपून बसला.राहुल यांनी त्या सापाचे फोटो काढून सर्पमित्र कळसकर यांना पाठवले.त्यानंतर कळसकर यांनी ती धामिण असून बिनविषारी आहे.आम्ही येईपर्यत तिच्यावर लक्ष ठेवा कृपया तिला मारू नका अशी विनंती ढेपे यांना केली.

सर्पमित्र सुनील कळसकर आणि सर्पमित्र मनोहर शिंदे यांनी आल्यावर किचन मध्ये जाऊन धामीणीस सुरक्षित पकडले आणि घराच्या बाहेर आणले.त्यानंतर जमलेल्या सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.यावेळी सर्पमित्रांनी सापाविषयीचे असलेले गैरसमज दूर केले.तसेच ढेपे कुटुंबीयांची सापांविषयी असलेली भीती घालवली.तसेच धामिण बिनविषारी असते.तसेच शेतात असणारे उंदीर,घूस यांना खाऊन ती शेतकऱ्यांची मदतच करते असे सांगून धामिणी विषयीचे गैरसमज दूर करून धामिण जातीचा साप त्यांना हाताळण्यास दिला.


यावेळी निसर्गाची सेवेकरी संस्था शिरुरचे सचिव आणि शिरुर रेस्क्यू टीमचे सदस्य सर्पमित्र सुनील कळसकर म्हणाले, महाराष्ट्रात एकूण ५२ सापांच्या जाती असून त्यातील फक्त (मण्यार,घोणस,नाग,फुरसे) या ४ जातींचे साप विषारी असतात तर काही साप हे निमविषारी तर काही साप बिनविषारी असतात.साप हा शेतकऱ्याचा मित्र असून अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदीर,घूस हे सापाचे खाद्य आहे.बऱ्याच वेळा उंदीर किंवा घूस यांच्या पाठीमागे साप शेतातून घरात येतात.परंतु गैरसमजामुळे अनेक वेळा शेतकरी या सापांना मारतात.

शिरुर तालुक्यात अनेक सर्पमित्र असून सापांना वाचवण्यासाठी ते अहोरात्र धरपडत असतात.त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही साप निघाल्यास त्यांना मारण्यापेक्षा तातडीने जवळील सर्पमित्राशी संपर्क साधावा.त्यामुळे अनेक सापांचे जीव वाचतील.

कुठेही साप आढळल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा 
निलेश पाठक मो. ९८२२३३६२३५
गणेश टिळेकर मो. ९९६०५१६३६६
सुनील कळसकर मो. ९५९५९४९१०४


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या