वर्षानुवर्षे उघड्या असलेल्या चाऱ्यांमुळे अपघात...

Image may contain: car and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता.२५ फेब्रुवारी २०२० (आकाश भोरडे): तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) या शिरुर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गावचा मुख्य रस्ता काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेला आहे.परंतु आजही त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी चाऱ्या बुजवलेल्या नाहीत.त्यामुळे या चाऱ्यांमुळे अनेक लहानमोठे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.


तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक दिवसांपूर्वी खणलेल्या उघड्या स्वरूपाच्या चाऱ्या आज देखील तशाच आहेत. या चारीमध्ये वेगवेगळ्या वाहनांचा यापूर्वी अपघात झाला आहे.तसेच या ठिकाणी वाहतूककोंडी होऊन शालेय मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.परंतु संबंधित विभागाचे याकडे जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.तळेगाव येथील १ किमी अंतराच्या मुख्य रस्त्याचे काम खुप दिवसानंतर मार्गी लागले होते.परंतु सदर काम करताना ठेकेदाराने या रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या चाऱ्यांचे नियोजन केले नसल्यामुळे अनेक ठिकाणी उघड्या चाऱ्या असल्यामुळे सतत अपघात घडत असतात.


काही ठिकाणी दुकानदारांच्या दुकानासमोर चारी खोदल्यामुळे दुकानदारांनी स्वतःच्या खर्चाने नळ्या आणून गाडल्या आहेत.तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या या उघड्या चाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे या चार्‍या अतीशय धोकादायक ठरत आहे तर या भागात बंदीस्त गटार व त्यावर लोखंडी जाळी टाकून चारी काढण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

प्रदूषण महामंडळाकडे तक्रार करणार...
तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याचे काम करत असताना रस्त्याच्या कडेला गटार लाईन टाकण्यासाठी चारी खोदण्यात आली असून आज देखील कित्येक दिवस उलटून त्या चाऱ्या तशाच आहेत.मुळात शासन नदी स्वच्छतेची मोहीम राबवीत असताना या खोदलेल्या चाऱ्या मार्फत गटारचे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे.हे चुकीचे असून याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे चर्चा करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरुर-हवेलीचे अध्यक्ष कैलास नरके यांनी सांगितले.

याबाबत तळेगाव ढमढेरे येथील ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळत मी पंचायत समितीच्या मिटिंग मध्ये असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या