अशोक पवारांना झाली 'ग' ची बाधा': बाबूराव पाचर्णे

Image may contain: 2 people
शिरूर, ता. 26 फेब्रुवारी 2020: शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना "ग' ची बाधा झाली असून, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी म्हटले आहे.

कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या मुद्यांवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी बोलताना पाचर्णे म्हणाले, 'जुन्या कामांचे पुन्हा उद्‌घाटन करणाऱ्या किंवा आमची कामे थांबवून स्वतः सुचविलेली कामे होण्यासाठी आटापिटा करणाऱ्या आमदारांना शिरूर-हवेलीसाठी अद्याप दमडा मिळविता आला नाही. पूर्वीच्या सरकारने केलेल्या कामांवर स्वतःचे "लेबल' लावण्याचा त्यांचा धंदा सुरू आहे. भंपकबाजी करून विधानसभा जिंकली; तरी आगामी निवडणुका त्यांना जड जातील.'यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, गणेश ताठे, विशाल घायतडक, श्रीकांत सातपुते, दिलीप शेलार, राजेंद्र भुजबळ, रोहित खैरे, बाबूराव पाचंगे, जे. आर. काळे, अशोक शेळके, सतीश पाचंगे, आबासाहेब सरोदे, राजेंद्र गदादे, विक्रम पाचुंदकर, राहुल गवारे, आबासाहेब सोनवणे, संदीप ढमढेरे, आत्माराम फराटे व कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


ऍड. खांडरे, दादा पाटील फराटे, कारेगावचे सरपंच किसन नवले, जयेश शिंदे, ज्ञानेश्‍वर भैरट, रश्‍मी क्षीरसागर, विलास आदक, संदीप साकोरे, विजय नरके, नवनाथ जाधव, रवींद्र दोरगे, अनिल नवले आदींची भाषणे झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या