गोडाऊन मधून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

Image may contain: 6 people, people standing, child and outdoor
रांजणगाव गणपती, ता. २६ फेब्रुवारी २०२० (तेजस फडके): रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत असलेल्या चमाडिया गोडाऊन येथे LG  कंपनी चे टी.व्ही, फ्रिज,वॉशिंग मशीन भरलेल्या टेम्पोतून दि. ३१ जानेवारी २०२० रोजी पहाटे च्या वेळी अज्ञात चोरट्यांनी LG कंपनीचे ७ टी.व्ही चोरी केले होते.


त्याचप्रमाणे दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी चमाडिया गोडाऊन येथे LG कंपनीचा मालाने भरलेलया टेम्पोमधील ६ LG  कंपनीचे टी.व्ही अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते.रांजणगाव MIDC तील व्यावसायिक गोडाऊन मधून १५ दिवसात LG सारख्या नामांकित कंपनीचे टी.व्ही चोरी गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या डी.पी पथकाचे कर्मचारी यांना योग्य सूचना करून सदरची दोन्ही प्रकरणे उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते.पोलीस नाईक अजित भुजबळ,पोलीस नाईक मंगेश थिगळे यांनी त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळवून दोन्ही घडलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत.त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे गोडाऊन मध्ये बाहेरून माल भरण्यासाठी येणाऱ्या गाडीवरील चालक हे,गोडाऊन मध्ये माल भरून पार्क केलेल्या गाड्यांमधील टी.व्ही चोरी करत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर रांजणगाव पोलिसांनी सापळा रचून संतोष प्रकाश पवार सध्या रा.रांजणगाव गणपती, ता. शिरूर जि. पुणे (मूळगाव रा. चंदनपुरी नाशिक) नितीन ज्ञानदेव बुळे रा. रांजणगाव गणपती,ता. शिरूर जि. पुणे (मूळगाव रा. कळस पिंपरी पाथर्डी जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले अडीच लाख रुपयांचे LG कंपनीचे १३ टी.व्ही आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण ६,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या दोन आरोपींनी रांजणगाव पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यावसायिक गोडाऊन मधील सिगारेटचा माल चोरी केला असल्याचे निष्पन्न होत असून सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब पुणे ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना साहेब बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत साहेब रांजणगाव पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार तुषार पंदारे,पोलीस नाईक अजित भुजबळ,पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस नाईक प्रफुल्ल भगत,पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ,पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे या पथकाने केली आहे. या  दोन्ही चोरट्यांनी शिक्रापूर व रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत व इतर ठिकाणी सिगारेट चोरीस गेलेल्या मालाबाबत पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या