गावठी दारूची वाहतूक करणारी कार ठोकरली...

Image may contain: car
कोरेगाव भीमा, ता. २७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील करंदी रस्त्याने गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या कारची रस्त्याच्या कडेला दुचाकी धूत असलेल्या युवकास जोरदार धडक बसून दुचाकीचे नुकसान होऊन युवक गंभीर जखमी झाला.शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कार व त्यामधील दारू जप्त केली आहे.याबाबत शिवराज मारुती कदम (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर, मूळ रा. हिप्परगा, ता. कंदार, जि. नांदेड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी कार चालक विजय राधेशाम चव्हाण (रा. नांदूरगाव, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वढू बुद्रुक येथील राणोबामळा येथे शिवराज कदम यांच्या घरासमोरून वाहत असलेल्या पाटाच्या पाण्यामध्ये गणेश कदम हा मुलगा त्याची दुचाकी धूत होता.यावेळी वढू गावच्या दिशेने अल्टो कार भरधाव वेगाने आली,यावेळी कारची दुचाकी व दुचाकी धूत आलेल्या गणेशला जोरात धडक बसली.यावेळी गणेश ओरडू लागल्याने घरातील लोक बाहेर आले.


त्यावेळी त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.यावेळी दुचाकी धूत असलेला गणेश शिवराज कदम (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला.त्यावेळी कारमध्ये पाहिले असता गावठी दारूचे चार कॅन दिसून आले.जखमी गणेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.शिक्रापूर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी कार व दारूचे चार कॅन जप्त केले.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या