कोणतीही भाषा हे संवादाचं माध्यम आहे...

Image may contain: 1 person, beard and closeup
पुणे, ता. २८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): कोणतीही भाषा हे संवादाचे माध्यम आहे.तो आशय नाही.त्यामुळे एखाद्याची भाषा कशी आहे? हे पाहण्यापेक्षा तो काय बोलतोय,त्याचा नेमका अर्थ काय आहे हे पाहायला हवं,असं वक्तव्य लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे.मराठी दिनानिमित्त जागतिक मराठी अकादमीतर्फे नागराज मंजुळे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन आज बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं होतं.


मला माझी भाषा बोलणारी पात्र सिनेमांमध्ये हवी होती.त्यामुळे माझ्या सिनेमांमधील पात्रे तशी भाषा बोलतात.पुण्यात शिक्षणासाठी आलो तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड होता.विद्यापीठात असताना मलाही इंग्रजीची भीती वाटत असल्याचं नागराज मंजुळे यांनी म्हटलं आहे.अमिताभ यांना भेटायला गेलो तेव्हा आमची अर्ध्या तासाची भेट ठरली होती.


पण तासापेक्षा जास्तवेळ आम्ही गप्पा मारल्या.त्यांच्यासोबत जर इंग्रजी बोलायची वेळ आली तर आम्ही आमच्या एका सहकाऱ्याला सोबत घेतले होते.परंतु तशी वेळ आली नसल्याचंही नागराज मंजुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.वात्रटीकाकार रामदास फुटाणे आणि निर्माते दिग्दर्शक विवेक वाघ आणि मंजुळे विविध विषयांवर मंजुळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.तसेच सैराटचा आपला प्रवासही नागराज मंजुळेंनी उलगडून सांगितला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या