नांदेड येथे ५ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार...

Image may contain: 1 person, selfie and closeup
नांदेड ता. २८ फेब्रुवारी २०२० : नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथे ५ वर्षाच्या मुलीचे अपहर करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.याच गावातील २८ वर्षीय सुग्रीव उर्फ बाबुराव मोरे या नराधम तरुणाने चिमुकलीवर अत्याचार केल्याचं उघड झालंय.गावातील ५ वर्षांच्या मुलीला पळवून नेलं होतं.त्यानंतर परिसरातील शेतात त्याने तिच्यावर अत्याचार केला.दुसऱ्या दिवशी शेतात पीडित मुलगी विवस्त्र अवस्थेत आढळली आहे.वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.या घटनेमुळे जिल्हयात संताप व्यक्त केला जात आहे.आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.


या अत्याचाराच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं.या आंदोलनामुळे नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प पडलाय.अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी सुग्रीव मोरेला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याच मागणीसाठी ग्रामस्थानी रस्ता अडवून धरला आहे.या घटनेनंतर सलग आज तिसऱ्या दिवशी सोनखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.या ५ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोनखेडचे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.या सर्व घडामोडीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गावकऱ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलेलं आहे.

अवघ्या ५ वर्षाच्या चिमुरडीचा अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे.मुलाला निर्जनस्थळी शेतात नेऊन तिच्यावर नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे.नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथील ५ वर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळपासुन बेपत्ता झाली होती.या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता.हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला.मात्र ती चिमुरडी सापडली नाही.


बुधवारी सकाळी सोनखेड शिवारातील एका शेतात चिमुकली रडतांना सापडली.त्यावेळी तिच्या अंगावर कपडेही नव्हते.तिच्या शरीरावर जखमां होत्या.पीडित मुलीला तात्काळ शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणी झाल्यास उघड झाले.सध्या मुलीची प्रकृती स्थीर असली तरी ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही.या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणामुळे सोनखेड मध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या