कान्हूर मेसाईत पळविले बैलगाडे अन् झालं असं...

Image may contain: one or more people
शिक्रापूर, ता. 29 फेब्रुवारी 2020 (पोलिसकाका): उच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतींवर बंदी असताना देखील न्यायालयाचे आदेश झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलगाडे पळविल्याप्रकरणी कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील 20 जणांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.संजय फक्कडराव शिंदे, सुधीर नानाभाऊ पुंडे, बंडू निवृत्ती ननावरे, चंद्रकांत सर्जेराव दळवी, कैलास सुभान ननावरे यांच्याह 15 ते 20 जण (सर्व रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर) यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. पोलिस कर्मचारी  भास्कर महादेव बुधवंत (रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.


कान्हूर मेसाई गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून, त्या ठिकाणी बैलगाडे पळविले जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलिस कर्मचारी भास्कर बुधवंत हे कान्हूर मेसाई गावामध्ये गेले असताना त्यांना तेथील बैलगाडा घाटामध्ये बैलगाडे जुंपून बैलांना पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिस आल्याची समजताच तेथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे तसेच बैलगाडे पळविणारे पळून गेले.


यावेळी पोलिसांनी माहिती घेतली असताना संजय फक्‍कडराव शिंदे यांसह गावातील काही ग्रामस्थांनी एकत्र येत बैलगाडा शर्यत समिती स्थापन करून त्यानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलगाडे पळविले असल्याचे समजले. त्यावरून वरील 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलिस नाईक तेजस रासकर हे करत आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या