इंदुरीकर महाराज्यांच्या 'या विधानावरून' अडचणीत वाढ...

Image may contain: 1 person
नगर, ता. २९ फेब्रुवारी २०२० : पुत्रप्राप्तीबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले निवृत्ती देशमुख तथा इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्‍यता आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे त्या वक्‍तव्याचे पुरावे सादर केले आहेत.आता पुन्हा जिल्हा आरोग्य विभागाला याची पडताळणी करावी लागणार आहे.सम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,असे वक्‍तव्य इंदुरीकर महाराजांनी एका प्रवचनात केल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी करत आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.यावर नगर जिल्हा आरोग्य विभागाच्या PCND समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती.पोलीसांच्या तपासात असा कोणताही व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलीसांच्या सायबर सेलने आरोग्य विभागाला आपला अहवाल कळवल्याने इंदुरीकर महाराज यांच्यावरील बालंट टळले होते.मात्र आता अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे इंदुरीकर महाराजांच्या त्या वक्‍तव्याचे पुरावे दिले आहेत.याबाबत दिलेल्या पत्रकात अ‍ॅड. गवांदे यांनी म्हटले आहे की,उरण तालुक्‍यातील इंचगिरी संप्रदायाच्या विद्यमाने ३१ डिसेंबर २०१९ ते ७ जानेवारी २०२० या दरम्यान हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात दि. २ जानेवारी रोजी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते.


या किर्तनात त्यांनी स्त्री संग बाबतचे वक्‍तव्य केल्याचे यूट्युब व टीकटॉक या सोशल मिडियावरून व्हायरल झाले होते.याबाबत महाराजांनीही एका दैनिकाला मुलाखत देताना मान्य केले होते.मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासात तपासणी करणे गरजेचे आहे.मात्र तसे न झाल्याने यूट्युबवरील व्हिडिओ काढून टाकण्यात आले.मात्र मी संगमनेर येथील रहिवाशी असल्याने तेथे युट्यूबवर तो व्हिडिओ पाहिला व संबंधीत वर्तमानपत्रातील बातमीही वाचली आहे.असे अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या