राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने दिला राजीनामा...

Image may contain: 1 person, outdoor
पुणे, ता. २९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): माझ्यावर विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ऋणी आहे.असे सांगत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.राणा यांनी अचानकपणे राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.आपल्या पदाची मुदत संपल्याने आपण राजीनामा दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना राणा म्हणाले,‘माझ्यावर विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ऋणी आहे.असे सांगून पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असे म्हटले आहे.तसेच आपण युवक राष्ट्रवादीत काम करण्यास इच्छुक असून मला संधी द्यावी.अशी मागणी पाटील यांनी केली आहे.


अजिंक्यराणा पाटील हे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे सुपूत्र आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत असताना राजन पाटील मात्र शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यासोबत राहिले.लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची लाट असतानाही मोहोळ तालुक्यातून मताधिक्य दिले होते.विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या