'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप...

Image may contain: 1 person, beard
मुंबई, ता. २९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): अल्पावधीत लोकप्रिय झालेली झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी राजे' ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होण्याआधी संभाजी मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्याजवळच्या वढू या ठिकाणी जाऊन संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले.त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषेदेदरम्यान या मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांचे अश्रू अनावर झाले होते.पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाले.आज प्रसारित होणारा शेवटचा भाग पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणवणार आहेत.तसेच 'स्वराज्य रक्षक संभाजी राजे' यांच्या टीमने घेतलेले समाधीचे दर्शन देखील दाखवणार आहेत.मध्यंतरी संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाही.त्यामुळे मालिकेतील चित्रीकरण थांबवा अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले होते की,मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे,काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल.


मालिकेत बदल केल्याबाबत जे वृत्त छापलं ते धादांत खोटं आहे.आवश्यक खबरदारी घेऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे.कोणताही भाग वगळावा अन्यथा नाही तो अधिकार निर्मात्याचा नाही तर झी मराठी वाहिनीचा आहे असं ते म्हणाले होते.माझी मालिका नेहमीच TRP च्या रेसमध्ये अव्वल स्थानावर राहिली.डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.संभाजी प्रमाणेच शंतून मोघेने साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत असलेली येसूबाईंची भूमिकेला ही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या