तळेगाव ढमढेरेत जुगार खेळणाऱ्यांना पळता भुई थोडी...

No photo description available.
तळेगाव ढमढेरे, ता. 2 मार्च 2020 (PoliceKaka): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील चिमणापीर मळा रस्त्यालगत एका खोलीत जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांना पळता भुई थोडी झाली. शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.तळेगाव ढमढेरे येथील चिमणापीर मळा रस्त्यालगत एका खोलीत जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. या वेळी रोख साडेपाच हजार रक्कम सापडली. जुगार खेळणाऱ्या जगन शिंदे, दत्तात्रेय शितोळे, संजय गायकवाड, रामदास जेधे, संतोष दरेकर, मुन्ना मोमीन, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब भूमकर, नाथू भुजबळ यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी त्यांची पळता भुई थोडी झाली. पण, पोलिसांनी त्यांना पकडलेच. याबाबतची चर्चा परिसरात रंगली आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या