'त्या' डाळींब अडत्यांना ३० कोटींचा दंड...

Image may contain: food
पुणे, ता. २ मार्च २०२० (प्रतिनिधी): डाळींब शेतकऱ्यांच्या पट्टीतून अतिरिक्त हमाली,भराई,तोलाई,खरेदीदारांकडून नियमांपेक्षा अधिक लेव्ही आणि इतर बाजार शुल्काच्या नावावर ज्यादा पैसे कापल्याप्रकरणात मार्केट यार्ड येथील डाळींब यार्डातील त्या ४ डाळींब यार्डातील आडत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोठावलेला ३० कोटी ५५ लाख रुपयांचा दंड १५ दिवसात भरण्याचा आदेश प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिला आहे.याबाबत चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे.


के.डी.चौधरी मे.सिद्धारूढ फ्रुट एजन्सी,मे.दिलीप बाळकृष्ण डुंबरे,मे.भास्कर नागनाथ लवटे या ४ आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी बाजार समिती प्रशासनाने ताब्यात घेतले होते.१ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतल्या पट्ट्या सनदी लेखपालांकडून तपासण्यात आल्या.त्यात या ४ आडत्यांनी हमाली,भराई,तोलाई नियमापेक्षा अधिक कापत २ वर्षांत १२ कोटी २२ लाख १३ हजारांची लूट केल्याचे उघड झाले होते.त्यात बाजार समितीच्या शुल्काचाही समावेश आहे.या फसवणुकीबाबत बाजार समितीने संबंधित आडत्यांना लुटीच्या रक्‍कमेसह दीड पट दंडाची रक्‍कम म्हणजेच ३० कोटी ५५ लाख ३३ हजार रुपये भरण्याची नोटीस नोव्हेंबर महिन्यात बजावली होती.यावर १५ दिवसांत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.यानंतर संबधित आडत्यांनी मांडलेले खुलासे असमाधानकारक आल्याने ही रक्कम वसुलपात्र असल्याचे सांगत बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी १५ दिवसांत पैसे भरण्याच आदेश दिले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या