अन...त्यांनी घातलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध


Image may contain: dog
सादलगाव,ता.२ मार्च २०२० (संपत कारकुड): आपण सहज रस्त्याने चाललोय आणि अचानक एखादा कुत्रा आपल्याला भुंकला तर आपण घाबरतो आणि त्या कुत्र्याला दगड मारतो.बऱ्याच वेळा तो दगड त्या कुत्र्याला लागतो आणि त्याला जखम होते.सामाज्याची बदलत चाललेली मानसिकता पाहता आज अनेक ठिकाणी कुत्र्यांची सर्रास हत्या केली जाते.कुत्रा हा सगळ्यात ईमानी प्राणी असल्याचं आपण अनेक कथा आणि कांदबरी मधुन वाचलही असेल आणि आजही सामाज्यात कुत्र्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालुन माणसाचा जीव वाचवल्याची अनेक उदाहरण आपण सोशल मीडियावर पहातो.


कुत्र्यांची जाणुन-बुजून हत्या करणाऱ्या समाज कंटकांपुढे सादलगाव (ता.शिरुर) येथील मोलमजुरी करुन पोटाची खळगी भरणाऱ्या भगत कुटुंबाने पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावलेल्या आणि १ वर्षापुर्वी निधन झालेल्या "मोती" नावाच्या कुत्र्याचे वर्षश्राद्ध घालुन त्यांनी समाज्यापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
त्यामुळे आसपासच्या परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत दिसून असुन जीवापाड जपलेल्या मोतीच्या आठवणी सांगताना मालकाच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा सागर वाहत आहे.

गेल्या २० वर्षापासुन दिगंबर दत्तोबा भगत हे आपल्या कुटुंबासह सादलगाव येथे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात.भगत कुटुंबाने मोलमजुरी करत असताना,एका लहान भटक्या कुत्र्याला आसरा दिला.त्याचे पालन पोषण,संगोपन केले.हे करत असताना या कुटुंबाला या "मोती" कुत्र्याचा खुपच लळा लागला. पोटच्या पोरापेक्षा ही या कुत्र्यावर जिवापाड प्रेम केले .एखाद्या मुक्या प्राण्याला आपण जीव लावला की तो प्राणीही आपला होतो असं म्हणतात ना तसंच मोतीच्या बाबतीत पण घडल.मोतीही या परिवाराचा एक सदस्य झाला आणि अनेक संकटातून मोतीनं या कुटुंबाच संरक्षण केलं होत.तसेच भगत कुटुंबाबरोबर गावातील ग्रामदैवत बापुजीबुवा यांचा पालखीबरोबर वारकरी होण्याचा मानही मिळविला होता.


परंतु वर्षभरापूर्वी अचानक  या लाडक्या मोतीचे निधन झाले.अन् आपल्या कुटूंबातीच एक सदस्य गेल्याने कुटूंबातील सगळ्यांनाच त्याचे दुःख अनावर झाले.मोतीच्या निधनानंतर भगत कुटुंबीयांनी हिंदू संस्कृतीत जसा माणसाचा दुखवटा पाळून त्यांचा अंत्यविधी,दशक्रीया विधी केला जातो तसंच "मोती" चा अंत्यविधी आणि दशक्रिया विधी केला.त्यानंतर भगत कुटुंबाने "मोती" ला न विसरता एक वर्षानंतर काल (दि १) रोजी मोतीचे वर्षश्राध्द व  श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमावेळी भजन, जेवण आदी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावत श्रध्दांजली अर्पण केली.

आपल्या परिवारातील मोती हा सदस्य हरपल्याने मोतीच्या मालकीण मंदा भगत यांनाही बोलताना अक्षरशः अश्रू अनावर झाले.स्वतःच्या पोट च्या मुलांपेक्षाही जास्त जीव या मोती ला लावला तर मोती ने ही अनेक संकटात साथ दिली होती.कुटुंबाचे  चांगले रक्षण केले होते.या मोती ला आम्ही सर्व कुटुंबीय  आजन्म विसरू शकणार नसल्याच्या भावना त्यानी यावेळी व्यक्त केल्या.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या