आपण विष पिकवतो आहोत :- राहीबाई पोपरे

Image may contain: 1 person, standing, plant, outdoor and nature
मुंबई, ता. ३ मार्च २०२० (प्रतिनिधी): ‘लहानपणी जे गाव मी बघितले होते,तेच पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.सुरुवातीला समोरची आव्हाने बघून घाबरायला झाले,पण जिद्द होती,’असे शेतकरी आणि पर्यावरण रक्षक राहीबाई पोपरे म्हणाल्या.आपण अन्नात विष तयार करायला लागलो आहोत.तसेच आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की,त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत असं त्या म्हणाल्या.वातावरण फाउंडेशन आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फोरम- SBM चा विद्यार्थी विभाग यांनी विलेपार्ले येथील स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट तर्फे आयोजित 'एक प्रयास' या कार्यक्रमात राहीबाई पोपरे बोलत होत्या.यावेळी बोलताना ते म्हणाले,‘रासायनिक खाते,फवारणी,कीटकनाशक यांच्यामुळे उत्पादन तर नक्कीच वाढले आहे.


जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की,त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत.त्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व आपल्याला कळायला हवे.आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी मेहनत घेतली पाहिजे,असे त्या म्हणाल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या