जन्मदात्या बापाचा चिमुरडीवर बलात्कार...

Image may contain: text
सोलापूर, ता. ३ मार्च २०२० : सोलापुरात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होत आहे.गेल्या दोन वर्षांपासून नराधम बाप अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य करत असल्याची फिर्याद पीडित चिमुरडीच्या आईनेच पोलिसात दिली आहे.


सोलापुरातील माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी पीडित चिमुरडी इयत्ता दुसरीत शिकते. आपल्या पतीनेच लेकीवर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने माढा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.गेल्या २ वर्षांपासून आपला पती आपल्या मुलीवर अत्याचार करत असल्याचा दावा महिलेने केला आहे.१९ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास घरी कोणी नव्हतं.मुलगी झोपल्यानंतर पतीने तिला उठवून तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला,असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे.घडलेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन नराधम पित्याने २ वर्षांपासून मुलीवर अत्याचार केले,असा आरोपही फिर्यादीत केला आहे.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन माढा पोलिसांनी नराधम पित्याला ताब्यात घेतलं आहे.पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या