बारामती क्राईम ब्रॅंचची शिरुरला धाडसी कारवाई...

Image may contain: text
शिरुर, ३ मार्च २०२० (प्रतिनिधी): शिरुर शहरामध्ये अवैध मटका जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती.त्या नुसार बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी  बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि शिरूर पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान यांच्यासह अचानक ६ मटक्याच्या अड्ड्यावर शिरूर मध्ये  छापा टाकला असता सदर ठिकाणी ७ इसम हे कल्याण मटका नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले होते.

या वेळी ७९,३१० एकूण रोख रक्कम व मटका जुगार खेळण्याची साधने-पेन,मटका बुके इ.पोलिसांनी जप्त केली.कारवाई वेळी अनेकांची मोठी धावपळ झाली.या प्रकरणी १) शशी निवृत्ती खांडरे रा. वाडा कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे (मटका मालक), २) संदीप विठ्ठल जाधव रा लाटेआळी.शिरूर,३) गणेश नामदेव माने रा . ढोर आळी शिरूर, ४) चंद्रकांत अमृतराव गवारले रा. पवार माढा शिरूर, ५) तोसिफ नजीर इनामदार रा पाबळ ता शिरूर, ६) मोहिनुद्दीन गुलाम हुसेन काजी रा. कुंभार आळी शिरूर, ७) सुभाष ओंकार भोंगळ रा इंदिरानगर शिरूर, ८) बाळू मूलचंद शर्मा रा भाजीबाजार शिरूर अशा  एकूण ८आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी  अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना (आयपीएस) बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे ,शिरूर पोलीस स्टेशन चे  सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील
क्राईम ब्रँच बारामतीचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ,संदीप जाधव,स्वप्निल अहिवळे,शर्मा पवार,विशाल जावळे तसेच आरसीपी पथकातील ७ पुरुष २ महिला जवान पोलिस जवान यांनी आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस जवान वैभव मोरे,अमित कडूस आदींनी कारवाई केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या