शिरूर तालुक्यातील तरुणीसोबत काढला सेल्फी अन्...

Image may contain: one or more people and outdoor
बारामती, ता. ४ मार्च २०२० (Policekaka): आजकाल कोणत्याही ठिकाणी फिरायला गेलं कि मोबाईल मध्ये सेल्फी काढणारे अनेकजण आपल्याला दिसतात.काही वेळा तर सेल्फी काढताना अनेकांचा जीवही गेलेला आहे. परंतु सेल्फी काढल्यामुळे एका महाविद्यालयीन तरुणीचा विवाह मोडल्याची घटना शिरुर तालुक्यात घडली आहे.

तरुणीबरोबर सेल्फी काढुन तो अश्लीलरीत्या एडिट करुन तरुणीचा ठरलेला विवाह मोडल्याप्रकरणी किरण प्रकाश शितोळे (रा. जाचकवस्ती, सणसर, ता.इंदापुर) येथील तरुणावर बारामती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संबंधित फिर्यादी युवती हि शिरुर तालुक्यातील आहे.ती बारामतीत जानेवारी २०१६ ते मार्च २०१८ दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.त्यावेळी तिचे मामा तिला भेटण्यासाठी महाविद्यालयात येत होते.त्यावेळी त्यांच्यासोबत किरण शितोळे हाही येत होता.त्यांवेळी त्याने त्या युवती सोबत काही सेल्फी घेतले.तो युवक ओळखीचा असल्याने त्या युवतीने काही हरकत घेतली नाही. परंतु नंतर काही दिवसाने तो युवक महाविद्यालयात वारंवार येऊन युवतीला माझ्याशी शारीरिक संबंध ठेव आपण लग्न करु अशी मागणी करु लागला.


परंतु तरुणीने त्याला नकार दिला.त्यामुळे त्या तरुणाने तुझ्यासोबत काढलेले फोटो तुझ्या घरच्यांना दाखवीन आणि तुझी बदनामी करीन अशी धमकी देत तिला वारंवार फोन करुन त्रास देण्यास सुरवात केली.युवतीने त्याचा फोन घेणं बंद केल्याने त्याने त्याच्या बहिणीच्या, मित्रांच्या फोनवरुन तिच्याशी संपर्क करत विवाह करण्याची धमकी देत होता. त्यामुळे अखेर त्याच्या त्रासाला कंटाळुन युवतीने ही गोष्ट घरच्यांना सांगितली.त्यानंतर फिर्यादीच्या घरच्यांनी किरण शितोळेच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला.


तरीपण किरण शितोळे याने फिर्यादी युवतीस त्रास देणे सुरुच ठेवले.त्यामुळे ती युवती शिक्षण बंद करुन गावी निघुन गेली.सन २०१८ मध्ये ती युवती दौंड येथे आपल्या मावशीकडे गेली होती.तेथेही किरण याने या युवतीला भेटण्याचा प्रयत्न करत तिच्या मावशीलाही दमबाजी केली. तसेच या युवतीचे डिसेंबर २०१९ रोजी लग्न ठरले त्यानुसार गंधाचा कार्यक्रमही पार झाला होता.येत्या ११ मार्च रोजी त्या युवतीचा विवाह होणार होता.परंतु २२ फेब्रुवारी २०२० रोजी किरण शितोळे याने युवतीसोबत काढलेले सेल्फी अश्लील पद्धतीने एडीट करुन तिच्या भावी पतीला दाखविले.

त्यामुळे ठरलेले मोडले त्यामुळे किरण शितोळे विरोधात संबंधित युवतीने बारामती पोलीस ठाण्यात विनयभंग माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या