धोकादायक बस थांब्यांची जागा अतिक्रमणाच्या ताब्यात...

Image may contain: outdoor
पुणे, ता. ४ मार्च २०२० (प्रतिनिधी): शहरातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बसथांबे PMPML कडून काढले.त्यांच्या जागी अतिक्रमणांची संख्या वाढली आहे.सिंहगड रस्त्यावर PMP ने काढलेल्या बसथांब्यांच्या जागी शोरुमच्या नवीन दुचाकी पार्क केल्याने प्रवाशांनी उभे राहायचे कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.शहरातील बाणेर, सुस रस्ता, सिंहगड रस्ता व इतर ठिकाणच्या धोकादायक बसथांब्यांचा सर्व्हे करण्यात आला.यामध्ये,१० ते १२ वर्षांहून अधिक जुने बसथांबे PMP कडून काढण्यात आले.आता या थांब्यांची जागा अतिक्रमणांनी घेतली आहे.यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे.हे बस थांबे काढल्यानंतर PMP व महापालिकेने बसथांबे उभारणे आवश्‍यक असताना दुर्लक्ष होत आहे.सिंहगड रस्ता, बाणेस-सुस रस्त्यावरील 15 वर्षाहून अधिक कालावधी झालेले धोकादायक बसथांबे काढले आहेत.नवीन बसथांबे उभारण्याबाबत स्थानिक नगरसेवकांनी निधीची तरतुद केल्यानंतर बसथांबे उभारण्यात येतील.याबाबत,PMP प्रशासनही पाठपुरावा करत असल्याचे स्थापत्य विभागप्रमुख डी. एम. तुळपुळे यांनी सांगितले. PMP च्या ताफ्यात नव्याने बस दाखल होत आहेत.त्या तुलनेत शहरात बसथांब्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. PMPP ने दररोज ११ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक होत असताना पुणे आणि पिंपरी शहरात केवळ १३०० थांबे आहेत.बस आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन दोन्ही शहरात तब्बल ३९०० थांबे शेडची (बसस्टॉप) गरज आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांबाहेर शेड असलेल्या बसथांब्यांची संख्या अत्यल्प आहे.उपनगरांतील खडकवासला, पौड, पिरंगुट, भूगाव, कळस, धानोरी, शिक्रापूर, शिवणे, कोंढवे धावडे, सासवड, कोंढणपूर, नसरापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, मोशी, चाकण, ताथवडे, सोमाटणे, मुळशी आदी गावांमध्ये शेड असलेले थांबे नाहीत. PMP मार्गांनुसार सुमारे ५ हजार २०० थांबे दिलेले असतानाही त्या ठिकाणी शेड उभारणे शक्‍य झालेले नाही.त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते.


शहरात बस थांबे उभारण्याबाबत दोन्ही महापालिकांनी प्रत्येकी २०० थांब्यांवर शेड उभारून द्यावेत,असे पत्र PMPने दोन्ही महापालिकांना २ महिन्यांपूर्वी दिले होते.अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाहीसिंहगड रस्त्यावरील तीन बसथांबे काढण्यात आले आहेत.या रस्त्याने शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही PMP ने थांबे काढले आहेत.नवीन बसथांब्यांची तरतुद झाल्यानंतर जुने थांबे काढण्याची आवश्‍यकता असताना PMP ने आधीच थांबे काढले आहेत.यामुळे,प्रवाशांची गैरसोय होत आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या