१९ मार्च ला होणार होत लग्न पण...

Image may contain: one or more people and people sitting
पुणे, ता. ५ मार्च २०२० (प्रतिनिधी): सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे सर्व्हिस रस्त्यावर नवले पूल चौकाजवळ डंपरची दुचाकीला धडक बसून अपघात झाला.यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर,एकजण गंभीर जखमी झाला आहे.यातील एका तरुणाचे १९ मार्चला लग्न होते.यामुळे नातेवाईकांना मोठा धक्‍का बसला आहे.या अपघातात विराज प्रताप निकम (वय. २८, रा. धनकवडी) हा हॉटेल व्यावसाईक ठार झाला.तर,प्रितेश प्रविण शहा (वय. २३, रा. गुलाबनगर, धनकवडी) हा गंभीर जखमी झाला आहे.ही घटना बुधवारी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास घडली.सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डस्ट भरलेला डंपर (क्र. MH.12 HB.1515) हा नऱ्हे बाजूकडून जात असताना ऍक्‍टिवा (क्र. MH. 12 PV. 9484) दुचाकीला धडक बसून अपघात झाला.घटनेची माहिती समजताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे, पोलीस हवालदार गोरख चिनके, अनिल भोसले, मार्शल बांडे, पुजारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.उपचारादरम्यान विराज याचा मृत्यू झाला.या अपघातात विराज याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती तर,प्रितेश याचा पाय फॅक्‍चर झाला.विराज याचा हॉटेल व कंपन्यांना भाजीपाला पुरवण्याचा आणि हॉटेल व्यवसाय आहे.हाताला आलेला कर्ता मुलगा गेल्याने कुटुंब हवालदिल झाल्याची माहिती येथील नागरिकांनी सांगितली.त्याच्या पश्‍चात आई,वडील व धाकटा भाऊ असा परिवार आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या