पुण्यात घरातील दागिने चोरणाऱ्याला अटक...

No photo description available.
पुणे, ता. ५ मार्च २०२० (प्रतिनिधी): नारायण पेठेत ज्येष्ठ महिलेच्या घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने शिरून धमकावून १ लाख ५ हजार रुपये सोन्याचा ऐवज चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.परंतु,याप्रकरणात चोरटा सोडून त्याच्याकडून सोने घेणार्‍यास पकडण्यात आले आहे.  बफैूल मनसुखलाल फिचडीया (वय. ५०, रा. कसबा पेठ) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४ दिवसांपुर्वी चोरट्याने नारायण पेठेतील घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता.त्यानंतर त्याने जेष्ठ महिलेला धमकावून १ लाख ५ हजारांचे दागिने चोरुन नेले.याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी २० CCTV तपासून चोरट्याचा मार्ग शोधून काढला.त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेत विचारपूस केली.परिसरातील CCTV ची तपासणी करुन चोरीचा ऐवज विकत घेणार्‍या बफैूलला ताब्यात घेतले.आता पोलिसांकडून चोरट्याचा माग काढला जात आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस  आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, समाधान कदम, अभिजीत चौगुले, शक्तीसिंह खानविलकर, बाबा दांगडे, धीरज पवार, चेतन शिरोळकर यांच्या पथकाने केली.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या